तुझे कर्मचारी खरंच पूर्ण करतील असा इंग्रजी कोर्स.

Tutoro सोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचा AI इंग्रजी शिक्षक मिळतो. खासगी शिकवणीच्या तोडीचे धडे, जे रोज करावेसे वाटतील.

सुरुवात कर

डेमो बुक कर

प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दरमहा फक्त $9 पासून. सदस्यत्व कधीही रद्द कर.

Tutoro कसं काम करतं · 2 मिनिटं

कसं चालतं ते पाहा

व्हिडिओ बंद कर

  • पुढची पातळी गाठली

    A1 → A2

  • + 138 XP

    आतापर्यंतचा सर्वात छान दिवस

  • सामना जिंकला

    फेऱ्यांचा निकाल: 3:1

  • आजची सगळी कामं पूर्ण

    3 / 3

  • 30 दिवसांचा Streak

    एकही दिवस खंड नाही

  • + 250 नाणी

    आठवड्याचा बोनस

  • नवी पातळी गाठली

    A2 → B1

  • लीगमध्ये पहिला क्रमांक

    30 जणांमध्ये क्रमांक 1

  • नवा शिक्षक मिळाला

    Katie

  • सगळी उत्तरं बरोबर

    12 पैकी 12 उत्तरं बरोबर

  • मॉड्यूल पूर्ण

    प्रवास

  • पहिलं पूर्ण वाक्य

    मोठ्याने बोलून दाखवलं

  • सलग पाच धडे पूर्ण

    एकाच बैठकीत

  • नवा पोशाख मिळाला

    5 000 खर्च केले

  • नवी पातळी गाठली

    B1 → B2

  • इंग्रजी बोलण्याच्या चाचणीत पास

    दुसऱ्या प्रयत्नात

कंपन्यांचा आमच्यावर विश्वास

  • 500

    +

    कंपन्या

    Tutoro वर कर्मचाऱ्यांना इंग्रजी शिकवतात

  • 1M

    +

    कर्मचारी

    दररोज शिकत आहेत

  • 87

    %

    सक्रिय वापरकर्ते

    90 दिवसांनंतरही सराव करत आहेत

  • Northbeam

  • ALTAVIA

  • Quadra

  • helioworks

  • Verado

Tutoro मुळे तुझ्या कंपनीला काय मिळतं

रोज फोनवर फक्त 15 मिनिटं, क्लाससाठी वेळ ठरवण्याची गरज नाही. याचा तुझ्या कंपनीला कसा फायदा होतो ते बघ.

  • इंग्रजीच्या बळावर व्यवहार पक्के कर

    49% वरिष्ठ अधिकारी सांगतात की संवादातल्या गैरसमजांमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार फिसकटला. Tutoro सोबत तुझ्या कर्मचाऱ्यांचं इंग्रजी सुधारतं, तेही खासगी शिक्षकापेक्षा 50 पटपर्यंत कमी खर्चात.

  • हे प्रशिक्षण कर्मचारी चुकवणारच नाहीत

    शिक्षकांसोबत शिकण्यापेक्षा AI सोबत सराव केल्याने इंग्रजी बोलण्यात जास्त सुधारणा झाली. Tutoro रोजच्या सरावाची सवय लावतं, तर खेळासारख्या उपक्रमांमुळे 88% कर्मचारी अधिक आनंदाने शिकतात.

  • कर्मचाऱ्यांची कौशल्यं वाढव, भरतीचा खर्च वाचव

    शिकण्याला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी टिकून राहण्याचं प्रमाण 57% जास्त असतं. कंपनीतच नव्या भूमिका स्वीकारण्याचं प्रमाणही 23% जास्त असतं. त्यामुळे तुला बाहेरून भरती कमी करावी लागते.

इतर पर्यायांच्या तुलनेत

Tutoro जास्त चांगलं का?

शिकायला मोकळीक, व्यवस्थापनाचा कमी व्याप आणि खर्चाचा आधीच अंदाज.

प्लॅन आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार किंमत बदलते

गटात शिकवणी

खाजगी शिक्षक

Tutoro

  • प्रत्येक कर्मचाऱ्यामागचा खर्च

    दरमहा $180 ते $320

    तासाला $40 ते $120

    दरमहा फक्त $9 पासून

  • शिकण्याचं वेळापत्रक

    वर्गाच्या ठरलेल्या वेळा

    शिकवणीची वेळ आधीच ठरवावी लागते

    वेळ मिळेल तेव्हा शिक, अगदी मधली 15 मिनिटं मिळाली तरी

  • गरजेनुसार शिक्षण आणि शिकण्याची प्रेरणा

    सगळ्यांना एकाच वेगाने शिकावं लागतं, खेळातून शिकण्याचे पर्याय कमी

    वैयक्तिक मार्गदर्शन शिक्षकावर अवलंबून

    प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पातळीला आणि उद्दिष्टांना साजेसे धडे, सोबत खेळाची मजा जी शिकण्याची आवड टिकवते

  • एचआरसाठी प्रगतीचा आढावा

    हजेरीवर आधारित अहवाल

    एचआरला प्रगतीची फारशी माहिती मिळत नाही

    डॅशबोर्डवर ताजी आकडेवारी + प्रगतीचे अहवाल

  • संपूर्ण कंपनीसाठी शिक्षण

    गट वाढतात, नियोजनाचा व्यापही वाढतो

    प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यासोबत खर्च आणि व्यवस्थापनाचा व्याप वाढतो

    सर्व कर्मचाऱ्यांना शिकण्यात सहज सहभागी करता येतं

सुरुवात अशी कर

हे कसं चालतं?

कर्मचाऱ्यांसाठी सदस्यत्वं खरेदी कर, त्यांना आमंत्रण पाठव आणि आज दुपारपासूनच सगळ्यांचा सराव सुरू होईल.

  • किती जण शिकणार ते ठरव

    किती कर्मचाऱ्यांसाठी आणि किती काळाचं सदस्यत्व हवं ते निवड.

  • सहकाऱ्यांना आमंत्रण दे

    ईमेल पत्त्यांची यादी पेस्ट कर किंवा सहभागी होण्यासाठी सगळ्यांना एकच लिंक पाठव.

  • सहकारी इंग्रजी बोलायला लागतात

    कर्मचाऱ्यांनी लिंकवर टॅप केलं की लगेच त्यांचा पहिला धडा सुरू.

  • प्रगतीवर लक्ष ठेव

    Streak, आठवडाभरात केलेला सराव आणि इंग्रजीच्या पातळीतली प्रगती, सगळं एकाच स्क्रीनवर.

शिकण्यात सातत्य

कर्मचारी शिकणं अर्धवट का सोडत नाहीत?

  • खऱ्या वर्गासारखं, बोलून शिक

    तू बोल. शिक्षक उत्तर देतात, समजावून सांगतात आणि बोलता बोलता सरावही करून घेतात.

  • हव्या त्या प्रसंगासाठी सराव कर

    नोकरीची मुलाखत दे, डॉक्टरांशी बोल, एखाद्या साहसी गोष्टीत सहभागी हो किंवा स्वतःचा प्रसंग लिही.

  • कोणाशी बोलायचं ते तूच ठरव

    प्रत्येक शिक्षकाचा बोलण्याचा लहेजा आणि स्वभाव वेगळा. तुला ज्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येतं, त्यांना निवड.

  • नेमकं काय सुधारायचं ते लगेच कळेल

    प्रत्येक धड्यानंतर तुझे गुण पाहा. कोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात, तेही जाणून घे.

  • शिकलेले शब्द पक्के लक्षात

    तुला विसर पडू लागलेले शब्द छोट्या खेळांतून पुन्हा पुन्हा भेटतात, अगदी पक्के लक्षात राहीपर्यंत.

  • नुसतं स्क्रोल नको, टप्प्याटप्प्याने शिक

    प्रत्येक धड्यासोबत नकाशावर पुढे जा आणि एका जगातले धडे पूर्ण केलेस की पुढचं जग खुलं होतं.

  • शिकत जा, लेव्हल वाढवत जा

    तुझं पात्र तयार कर आणि प्रत्येक धड्यासोबत त्याची लेव्हल वाढताना, ते वरच्या लीगमध्ये जाताना पाहा.

एचआरसाठी

कर्मचारी खरंच वापरतायत का? उत्तर तुला नेहमीच दिसेल

कोण शिकतंय, किती प्रगती होतेय आणि प्रत्येकाचं इंग्रजी कोणत्या पातळीवर आहे, हे सगळं एकाच डॅशबोर्डवर बघ. माहिती मिळवण्यासाठी कोणाच्याही मागे लागावं लागणार नाही.

कर्मचाऱ्यांचा सहभाग

मागील 30 दिवस · नमुना डेटा

  • वापरात असलेली खाती

    खरेदी केलेल्या सदस्यत्वांपैकी दर आठवड्याला कर्मचारी किती वापरतात ते बघ

  • प्रत्येक कर्मचाऱ्याची इंग्रजीची पातळी

    CEFR नुसार इंग्रजीची पातळी (A1-C1), शिकण्यातल्या प्रगतीनुसार अपडेट होत राहते.

  • प्रत्येक कर्मचाऱ्याचा सराव

    आठवड्याभरातील सरावाची मिनिटं, पूर्ण केलेले धडे आणि Streak

  • वित्त विभागाने मागताच अहवाल तयार

    स्क्रीनवर दिसतो तोच डेटा CSV मध्ये डाउनलोड कर.

Tutoro कोणासाठी?

ज्यांच्या रोजच्या कामात थोडं अधिक चांगलं इंग्रजी मोठा फरक घडवतं, त्यांच्यासाठी.

सुरू कर

  • ग्राहक सेवा विभाग

  • विक्री

  • अभियांत्रिकी

  • हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स

  • किरकोळ विक्री

  • आरोग्यसेवा

  • मार्केटिंग

यशोगाथा

तीन कंपन्यांमध्ये काय बदललं

  • आधी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी शिकण्यातला रस टिकवून ठेवणं कठीण जायचं. Tutoro मुळे आता ते आवडीने आणि नियमित शिकतात. कंपनीने दिलेली ही सुविधा त्यांना खरंच उपयोगाची वाटते. कर्मचाऱ्यांचं समाधानही वाढलंय.

    एचआर प्रमुख

    Northbeam

  • आमचे कर्मचारी आता परदेशी ग्राहकांशी अधिक आत्मविश्वासाने बोलतात. अडचणी सोडवण्यासाठी वरिष्ठांची मदतही कमी लागते. संवाद अधिक स्पष्ट झालाय, कर्मचारी स्वतःहून जास्त प्रश्न सोडवतात आणि ग्राहकांनाही चांगली सेवा मिळते.

    ग्राहक सेवा प्रमुख

    Altavia

  • प्रशिक्षणावर केलेल्या खर्चातून काय साध्य होतंय, हे आता आम्हाला स्पष्ट दिसतं. Tutoro च्या आकडेवारीतून कर्मचारी किती नियमित शिकतात, किती प्रगती करतात आणि कुठे कमी पडतात, हे समजतं. त्यामुळे आता आमचे निर्णय प्रत्यक्ष माहितीच्या आधारावर होतात.

    मुख्य परिचालन अधिकारी

    Helioworks

दर

प्रति कर्मचारी दरमहा $9 पासून

किती कर्मचारी शिकणार आहेत?

एकाच सवलतीच्या दरात सर्व कर्मचाऱ्यांचं शिकणं सुरू ठेव.

प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी, दरमहा

ग्रुप क्लासेसचा खर्च

खाजगी शिकवणीचा खर्च

चल, मिळून हिशोब करूया

1,000 पेक्षा जास्त जण शिकणार असतील, तर तुझ्या कंपनीसाठी स्वतंत्र दर देऊ. संख्येनुसार सवलत आणि इनव्हॉइसद्वारे पैसे भरण्याची सोयही मिळेल. आमच्या सेल्स टीमसोबत बोलून खर्च ठरव.

डेमो बुक कर

सदस्यत्वाचा कालावधी

शिकणारे

Tutoro, तुझा प्लॅन

कधीही रद्द कर

किती कर्मचारी शिकणार आहेत?

संपूर्ण टीमला शिकण्याची मजा घेऊ दे, सगळ्यांसाठी एकाच सवलतीच्या दरात.

नेहमी पडणारे प्रश्न

  • आमच्या कंपनीत Tutoro वापरायला सुरुवात कशी करायची?

    कंपनीचं खातं तयार कर, कर्मचाऱ्यांची संख्या निवड आणि त्यांना आमंत्रण पाठव. प्रत्येकाला त्याच्या इंग्रजीच्या पातळीनुसार आणि उद्दिष्टांनुसार शिकता येईल. आधी Tutoro कसं चालतं ते पाहायचंय? डेमो बुक कर.

  • किती खर्च येतो आणि पैसे कसे भरायचे?

    Tutoro वर प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दरमहा फक्त $9 पासून सुरुवात कर. किमान 5 कर्मचारी हवेत. कार्डने पैसे भर किंवा कंपनीच्या डॅशबोर्डवरून थेट इनव्हॉइस तयार कर.

  • एका कर्मचाऱ्याचं सदस्यत्व दुसऱ्या कर्मचाऱ्याला देता येईल का?

    हो. एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडली किंवा त्याला पुढे शिकायचं नसेल, तर त्याची सीट दुसऱ्या कर्मचाऱ्याला दे. प्रत्येक वेळी नवीन सीट विकत घ्यायची गरज नाही.

  • शिकण्यासाठीच्या जागांची संख्या कधीही वाढवता किंवा कमी करता येते का?

    गरजेनुसार सीट वाढव किंवा कमी कर. फक्त किमान 5 सीट ठेवाव्या लागतील. बिलात किती आणि कसा बदल होईल, हे तुझ्या सबस्क्रिप्शनच्या अटींवर ठरेल.

  • Tutoro वर कर्मचारी नेमकं काय शिकतात?

    इंग्रजी शिकण्यासाठी लागणारं सगळं Tutoro मध्ये आहे. AI शिक्षकासोबत धडे, बोलण्याचा सराव, ऐकून समजून घेणं, वाचन आणि शिकताना स्वतः सोडवायचे सराव. उच्चार तपासून लगेच काय सुधारायचं तेही कळतं. सगळं एकाच ॲपमध्ये.

  • कर्मचाऱ्यांच्या इंग्रजीच्या पातळीनुसार Tutoro शिकवण्याची पद्धत बदलतं का?

    हो. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या इंग्रजीच्या पातळीनुसार आणि उद्दिष्टांनुसार शिकता येतं. खेळासारख्या मजेदार सरावामुळे शिकण्याची आवडही टिकून राहते.

  • कर्मचाऱ्यांना रोज शिकण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो?

    एका वेळी फक्त 15 मिनिटं मिळाली तरी कर्मचारी शिकू शकतात. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. क्लासची ठरलेली वेळ नाही आणि धड्यासाठी आधी बुकिंगही करावं लागत नाही.

  • Tutoro कर्मचाऱ्यांचा शिकण्याचा उत्साह कसा टिकवून ठेवतं?

    Tutoro मध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार धडे, खेळातून शिकण्याची मजा, बक्षिसं आणि स्वतः भाग घेऊन शिकता येतील असे उपक्रम मिळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोज शिकावंसं वाटतं आणि हळूहळू सवय लागते.

  • एचआरला प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रगती पाहता येते का?

    हो. कंपनीच्या डॅशबोर्डवर प्रत्येक कर्मचारी किती नियमितपणे शिकतो आणि किती प्रगती करतो हे दिसतं. त्यामुळे HR ला कोण सहभागी होतंय आणि संपूर्ण टीमची प्रगती कशी होतेय, हे सहज पाहता येतं.

  • कर्मचाऱ्यांकडे कंपनीचा ईमेल आयडी असणं गरजेचं आहे का?

    नाही. आमंत्रणाचा कोड कोणत्याही ईमेल पत्त्याशी जोडलेला नसतो. जो कोड वापरेल, त्याला सीट मिळेल. कर्मचारी आधीपासून वैयक्तिक खात्यावर Tutoro वापरत असेल, तर त्याचा Streak, लीग आणि शब्दसंग्रह कायम राहतील. त्याच खात्यात कंपनीची सीट जोडली जाईल.

  • सुरुवात करायला किमान किती कर्मचारी हवेत?

    कंपनीत Tutoro सुरू करायला फक्त 5 कर्मचारी पुरेसे आहेत. छोटी टीम असो किंवा वाढणारी कंपनी, सगळ्यांसाठी सोयीचं.

रोजची सवय, दमदार प्रगती

तुझ्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी शिकण्याचा आणखी चांगला मार्ग दे. प्रत्येकाच्या गरजेनुसार मजेशीर धडे, ज्यासाठी रोजच्या कामातही सहज वेळ काढता येईल.

सुरुवात कर

डेमो बुक कर